मुख्य मजकुराकडे जा

घरगुती पूजांसाठी किमान १५ दिवस व काशी महायज्ञांसाठी १५ दिवस आधी बुकिंग आवश्यक

VedicKendraशास्त्रोक्त वैदिक पूजा व शुद्ध पूजा साहित्य

शास्त्रोक्त वैदिक पूजा,
संपूर्ण विधी व शुद्ध साहित्य

सत्यनारायणापासून अतिरुद्र महायज्ञापर्यंत — प्रत्येक पूजेचे महत्त्व, संपूर्ण साहित्य यादी आणि स्पष्ट दक्षिणा एकाच ठिकाणी. घरगुती पूजा तसेच त्र्यंबकेश्वर व काशी क्षेत्रातील विशेष अनुष्ठान.

सर्व पूजा विधी पहा
पूजा व विधी
१६२+
विधी श्रेणी
३०
पूजा साहित्य वस्तू
३००+
तीर्थक्षेत्रे
२
वेदमूर्ती साईप्रसाद दाणी

वेदमूर्ती साईप्रसाद दाणी

VedicKendra चे मुख्य आचार्य — प्रत्येक पूजा स्वतः करतात

VedicKendra वरून बुक होणारी प्रत्येक पूजा, अनुष्ठान व संस्कार वेदमूर्ती साईप्रसाद दाणी गुरुजी स्वतः, शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न करतात.

बुकिंगनंतर यजमानाशी संपर्क साधून मुहूर्त, पूजेची तयारी आणि साहित्याबद्दल आधीच मार्गदर्शन केले जाते, जेणेकरून पूजेच्या दिवशी सर्व काही शांतपणे व विधिवत पार पडेल.

  • प्रत्येक पूजा स्वतःबुक केलेली पूजा इतर कोणाकडे सोपवली जात नाही — गुरुजी स्वतः येतात.
  • शास्त्रोक्त विधीवैदिक मंत्र व परंपरेनुसार, संपूर्ण विधी.
  • घरी व तीर्थक्षेत्रीतुमच्या घरी, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि काशी येथे.
  • मुहूर्त व मार्गदर्शनपूजेपूर्वी मुहूर्त, तयारी व साहित्याबद्दल फोनवर मार्गदर्शन.
गुरुजींशी बोला

प्रत्येक प्रसंगासाठी शास्त्रोक्त विधी

नित्य पूजा, व्रत-सण, सोळा संस्कार, शांती विधी, पारायण, महायज्ञ आणि तीर्थक्षेत्र अनुष्ठान — ३० श्रेणींमध्ये १६२ पूजा विधी.

सर्वाधिक बुक होणाऱ्या पूजा

प्रत्येक पूजेचे महत्त्व, साहित्य आणि दोन्ही दक्षिणा पर्याय स्पष्टपणे.

तुमच्या सोयीनुसार तीन पर्याय

कोणतेही छुपे शुल्क नाही. प्रत्येक पूजेच्या पानावर काय समाविष्ट आहे ते स्पष्ट लिहिले आहे.

  • केवळ पौरोहित्य दक्षिणा

    फक्त गुरुजींचे मानधन. पूजेचे साहित्य तुम्ही स्वतः आणता — प्रत्येक पूजेच्या पानावर संपूर्ण साहित्य यादी (checklist) दिली आहे.

    उदा. श्री सत्यनारायण महापूजा₹२,५००

  • साहित्यासह प्रीमियम

    पूजेचे संपूर्ण शुद्ध साहित्य आम्ही आणतो. काही पूजांमध्ये हवन सामग्री, ग्रंथ प्रत, सिद्ध यंत्र किंवा महाप्रसादही समाविष्ट.

    उदा. श्री सत्यनारायण महापूजा₹३,८००

  • सामूहिक सहभाग

    तीर्थक्षेत्रावरील मोठ्या यज्ञांमध्ये अनेक जोडपी एकत्र बसतात — प्रति जोडपे कमी दक्षिणेत महायज्ञाचा लाभ.

    उदा. वैदिक महारुद्र स्वाहाकार याग (प्रति जोडपे)₹५,५००

षोडशोपचार — देवाची सोळा उपचारांनी सेवा

घरी आलेल्या सर्वोच्च अतिथीचा जसा सन्मान करतो, तसाच देवतेचा १६ पायऱ्यांनी केलेला आदर म्हणजे षोडशोपचार पूजा.

  1. १आवाहनAvahana
  2. २आसनAsana
  3. ३पाद्यPadya
  4. ४अर्घ्यArghya
  5. ५आचमनीयAchamaniya
  6. ६स्नानSnana
  7. ७वस्त्रVastra
  8. ८यज्ञोपवीतYajnopavita
  9. ९गंध (अनुलेपन)Gandha
  10. १०पुष्पPushpa
  11. ११धूपDhupa
  12. १२दीपDipa
  13. १३नैवेद्यNaivedya
  14. १४प्रदक्षिणाPradakshina
  15. १५नमस्कारNamaskara
  16. १६मंत्रपुष्पांजलीMantrapushpanjali

त्र्यंबकेश्वर आणि काशी येथील विशेष विधी

वैयक्तिक तसेच सामूहिक (Group) सहभागाचे पर्याय — अनुभवी स्थानिक वेदमूर्ती आचार्यांसह.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर

नाशिक

नारायण नागबली, काळसर्प शांती, त्रिपिंडी श्राद्ध तसेच महारुद्र, अतिरुद्र व महामृत्युंजय अनुष्ठान.

  • नारायण नागबली पूजा
  • काळसर्प शांती पूजा
  • त्रिपिंडी श्राद्ध पूजा
  • त्र्यंबकेश्वर शिवमहापुराण ज्ञानयज्ञ व श्रवण
  • वैदिक महारुद्र स्वाहाकार याग
  • भव्य अतिरुद्र महायज्ञ
त्र्यंबकेश्वर विधी पहा

श्री क्षेत्र काशी

वाराणसी

मोक्ष भूमीवरील महारुद्र स्वाहाकार, अतिरुद्र महायज्ञ, मणिकर्णिका घाट महा-पिंडदान आणि कालभैरव अनुष्ठान.

  • वैदिक महारुद्र स्वाहाकार याग
  • भव्य अतिरुद्र महायज्ञ
  • मणिकर्णिका / हरिश्चंद्र घाट महा-पिंडदान
  • काशी कालभैरव शांत व बटुक भैरव अनुष्ठान
काशी विधी पहा

लोकप्रिय पूजांचे दर — एका नजरेत

सर्व १६२ पूजांचे दर आणि साहित्य "पूजा विधी" पानावर श्रेणीनुसार उपलब्ध आहेत.

लोकप्रिय १२ पूजा

दर रुपयांमध्ये • "साहित्यासह" म्हणजे संपूर्ण पूजा साहित्यासह

क्र.पूजेचा प्रकारजोडपी संख्याकेवळ पौरोहित्य दक्षिणासाहित्यासह प्रीमियमसामूहिक सहभागबुकिंग
१श्री सत्यनारायण महापूजाShri Satyanarayan Mahapuja—₹२,५००₹३,८००संपूर्ण साहित्यासह—बुक करा
२गणेश चतुर्थी व्रत पूजाGanesh Chaturthi Vrat Puja—₹१,५००₹२,८००—बुक करा
३महालक्ष्मी / लक्ष्मीपूजन (दिवाळी)Mahalakshmi / Lakshmi Pujan (Diwali)—₹३,१००₹४,१००—बुक करा
४गृहप्रवेश वास्तू शांतीGriha Pravesh Vastu Shanti—₹७,५००₹१५,०००हवन साहित्यासह—बुक करा
५नवग्रह शांती विधीNavagraha Shanti Vidhi—₹५,१००₹९,५००—बुक करा
६उपनयन (मुंज)Upanayan (Munj / Thread Ceremony)—₹७,५००₹१५,०००पूर्ण साहित्यासह—बुक करा
७विवाह संस्कारVivah Sanskar (Vedic Wedding)—₹११,०००केवळ पौरोहित्य₹२५,०००होम व संपूर्ण विधी साहित्यासह—बुक करा
८नारायण नागबली पूजाNarayan Nagbali Puja—₹१४,०००₹२१,०००३ दिवसांचे तिकीट, साहित्य व शुल्कासह—बुक करा
९काळसर्प शांती पूजाKaal Sarp Shanti Puja—₹३,१००₹४,५००चांदीच्या नाग नागीण जोड व होम साहित्यासह—बुक करा
१०रुद्र अभिषेक (लघु रुद्र / महारुद्र)Rudra Abhishek (Laghu Rudra / Maharudra)—₹५,५००लघु रुद्र₹८,५००अभिषेक द्रव्य व संपूर्ण साहित्यासह—बुक करा
११षष्टीपूर्ती शांती / उग्ररथ शांती (वय वर्ष ६० पूर्ण, ६१ व्या वर्षात पदार्पण)Shashtipurti Shanti (60 years complete)—₹१०,५००सह-पुरोहितांसह₹२५,०००पूर्ण सजावट, होम व साहित्यासह—बुक करा
१२महामृत्युंजय मंत्र जप अनुष्ठान (१,२५,००० संख्यात्मक जप)Mahamrityunjay Mantra Jap (1,25,000)५ ते १५ जोडपी₹२१,०००५ वेदमूर्ती आचार्यांच्या ११ दिवसांच्या १,२५,००० मंत्र जपाच्या मानधनासह₹४५,०००सिद्ध मृत्युंजय यंत्र, संपूर्ण यज्ञ सामग्री व विधीसह₹५,५००प्रति जोडपेबुक करा

शुद्ध, प्रमाणित पूजा साहित्य — घरपोच

सिद्ध यंत्रे, नेपाळी रुद्राक्ष, जपमाळा, चंदन-अष्टगंध, धूप-कापूर, देव्हारा भांडी, हवन सामग्री आणि संपूर्ण पूजा किट. यादीत जोडा, ऑनलाइन पैसे भरा आणि घरपोच मागवा.

साहित्य दालन पहा

चार सोप्या पायऱ्यांत पूजा बुक करा

काशी येथील पूजांसह सर्व पूजा व अनुष्ठानांसाठी किमान १५ दिवस आधी बुकिंग आवश्यक.

  1. १. पूजा निवडा

    श्रेणी किंवा शोधाद्वारे पूजा निवडा; महत्त्व, साहित्य आणि दक्षिणा पाहा.

  2. २. पर्याय, तारीख व वेळ

    दक्षिणा पर्याय निवडा आणि गुरुजींच्या उपलब्ध तारखा व वेळांमधून तुमची वेळ निवडा.

  3. ३. ऑनलाइन निश्चिती

    आगाऊ रक्कम सुरक्षितपणे ऑनलाइन भरा — बुकिंग लगेच निश्चित; उर्वरित रक्कम पूजेच्या दिवशी.

  4. ४. विधी संपन्न

    वेदमूर्ती आचार्य नियोजित दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा संपन्न करतात.

पूजा, विधी आणि परंपरेची माहिती

षोडशोपचारापासून सोळा संस्कारांपर्यंत — सोप्या मराठीत सविस्तर लेख.

तुमच्या शंका, आमची उत्तरे

इथे उत्तर मिळाले नाही तर थेट विचारा — गुरुजी स्वतः मार्गदर्शन करतात.

पूजा किती दिवस आधी बुक करावी?

काशी (वाराणसी) येथील पूजांसह सर्व पूजा व अनुष्ठानांसाठी किमान १५ दिवस आधी बुकिंग करणे अनिवार्य आहे. काशी येथे ऐनवेळी आलेल्या यजमानांचे बुकिंग स्वीकारले जात नाही.

"केवळ पौरोहित्य" आणि "साहित्यासह प्रीमियम" दक्षिणेत काय फरक आहे?

केवळ पौरोहित्य दक्षिणा म्हणजे फक्त गुरुजींचे मानधन — पूजेचे साहित्य यजमान स्वतः आणतात (प्रत्येक पूजेच्या पानावर संपूर्ण यादी दिली आहे). साहित्यासह प्रीमियम दक्षिणा मध्ये पूजेचे संपूर्ण साहित्य आम्ही आणतो; काही पूजांमध्ये हवन सामग्री, ग्रंथ प्रत, यंत्र किंवा महाप्रसादही समाविष्ट असतो.

सामूहिक (Group) सहभाग म्हणजे काय?

त्र्यंबकेश्वर, काशी आणि काही मोठ्या अनुष्ठानांमध्ये अनेक यजमान जोडपी एकाच यज्ञात एकत्र बसून आहुती देऊ शकतात. यासाठी प्रति जोडपे / प्रति यजमान स्वतंत्र दक्षिणा असते आणि प्रत्येक विधीसाठी आवश्यक जोडपी संख्या (उदा. ५ ते ११ जोडपी) दिलेली आहे.

पूजा रद्द केल्यास पैसे परत मिळतात का?

बुक केलेली कोणतीही पूजा रद्द करून परतावा दिला जात नाही; मात्र पूजेची तारीख आणि वेळ बदलून घेता येते. आमच्याकडून अपरिहार्य कारणामुळे विधी रद्द झाल्यास भरलेली १००% रक्कम परत केली जाते.

बुकिंगसाठी कोणती कागदपत्रे लागतात?

धार्मिक स्थळांच्या स्थानिक सुरक्षा नियमांनुसार, पूजा करणाऱ्या मुख्य यजमानाचे आधार कार्ड देणे बंधनकारक आहे.

तुम्ही देवस्थानचे व्ही.आय.पी. दर्शन किंवा पास देता का?

नाही. आम्ही केवळ शास्त्रोक्त पूजा विधी, पुरोहितांचे मानधन आणि शुद्ध पूजा साहित्य या सेवा देतो. देवस्थानचे व्ही.आय.पी. दर्शन किंवा दर्शन पास यात समाविष्ट नाही.

पूजा साहित्य घरपोच मिळते का?

होय. सर्व प्रकारच्या पूजांचे शुद्ध व प्रमाणित साहित्य तसेच स्वतंत्र किट उपलब्ध आहेत. साहित्य दालनात वस्तू ऑर्डर यादीत जोडा आणि ऑनलाइन पेमेंट करून ऑर्डर द्या. प्रत्येक वस्तूचे डिलिव्हरी शुल्क स्वतंत्रपणे नमूद आहे.

पूजेमध्ये प्लास्टिक किंवा रासायनिक वस्तू वापरल्या जातात का?

नाही. नदी व तीर्थक्षेत्रांचे प्रदूषण रोखण्यासाठी आमच्या पूजांमध्ये केवळ नैसर्गिक साहित्य वापरले जाते.

पैसे कसे भरायचे? पूर्ण रक्कम आधी भरावी लागते का?

पूजा बुक करताना एकूण रकमेच्या ५०% आगाऊ रक्कम ऑनलाइन (UPI, कार्ड, नेटबँकिंग — Razorpay द्वारे सुरक्षित) भरावी लागते; उर्वरित रक्कम पूजेच्या दिवशी गुरुजींकडे द्यावी. पूजा साहित्य व कुंडलीच्या ऑर्डरसाठी संपूर्ण रक्कम ऑनलाइन भरावी. गुरुजींच्या ठिकाणापासून २०० किमीपुढील घरगुती पूजांसाठी ₹३० प्रति किमी प्रवास खर्च एकूण रकमेत जोडला जातो.

माझे बुकिंग किंवा ऑर्डर कसे पाहू?

माझ्या बुकिंग व ऑर्डर या पानावर बुकिंग करताना दिलेला मोबाईल नंबर लिहा — तुमच्या सर्व पूजा, साहित्य ऑर्डर व कुंडली ऑर्डरची स्थिती तिथे दिसेल.

तुमच्या घरी शास्त्रोक्त पूजेचे आयोजन करूया

मुहूर्त, साहित्य आणि विधीबद्दल कोणतीही शंका असल्यास थेट संपर्क करा.

संपर्क करा